बुलढाणा जिल्हा परिषदेच्या ६१ जागांचे आरक्षण जाहीर; अनेक ठिकाणी दिग्गजांना धक्का; महिला आरक्षणाने इच्छुकांच्या इच्छेवर फिरले पाणी; ३१ जागा महिलांसाठी राखीव...
अनुसूचित जाती एकूण १२ जागेपैकी सर्वसाधारण ६, महिला ६, अनुसूचित जमाती एकूण ३ जागेपैकी सर्वसाधारण १, महिला २, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण १६ जागेपैकी सर्वसाधारण ८, महिला ८, सर्वसाधारण एकूण ३० जागेपैकी सर्वसाधारण १५, महिला १५ अश्या एकूण ६१ जागांसाठी आरक्षण सोडत उत्साहात पार पडली.
या सोडतीच्या प्रक्रियेस मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार, तहसीलदार संजय बगाडे आदींसह संबंधित अधिकारी, जनप्रतिनिधी तसेच विविध पंचायत समित्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
असे निघाले जिल्हा परिषद गट निहाय आरक्षण
जळगाव जामाेद
जामोद : अनुसूचित जमाती
खेर्डा बु. : सर्वसाधारण
आसलगांव : अनुसूचित जमाती (महिला)
पिंपळगांव काळे : सर्वसाधारण
संग्रामपूर
सोनाळा : अनुसूचित जमाती (महिला)
बावणबीर : सर्वसाधारण (महिला)
पळशी झाशी : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
पातुर्डा बु. : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)
शेगाव
माटरगांव बु : अनुसूचित जाती
जलंब : अनुसूचित जाती (महिला)
नांदुरा
निमगांव : सर्वसाधारण (महिला)
वसाडी बु. : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
चांदूर बिस्वा : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
वडनेर भोलजी : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
मलकापूर
नरवेल : सर्वसाधारण (महिला)
मलकापूर ग्रामीण : सर्वसाधारण (महिला)
दाताळा : सर्वसाधारण (महिला)
माेताळा
पिंप्रीगवळी : सर्वसाधारण
कोथळी : सर्वसाधारण
धामणगांव बढे : सर्वसाधारण (महिला)
रोहिणखेड : सर्वसाधारण
बोराखेडी : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
खामगाव
सुटाळा बु. : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)
घाटपुरी : सर्वसाधारण
अटाळी : अनुसूचित जाती
अंत्रज : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
पिंपळगांव राजा : सर्वसाधारण (महिला)
कुंबेफळ : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)
लाखनवाडा बु. : अनुसूचित जाती
मेहकर
देऊळगांव साकर्शा : सर्वसाधारण (महिला)
डोणगांव : सर्वसाधारण
अंजनी बु : सर्वसाधारण
जानेफळ : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
कळंबेश्वर : अनुसूचित जाती (महिला)
देऊळगांव माळी : अनुसूचित जाती
उकळी : सर्वसाधारण (महिला)
चिखली
उदयनगर : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
अमडापुर : सर्वसाधारण (महिला)
इसोली : सर्वसाधारण
सवणा : सर्वसाधारण (महिला)
केळवद : अनुसुचीत जाती (महिला)
शेळगाव आटोळ : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
मेरा बु. : अनुसूचित जाती (महिला)
बुलढाणा
देऊळघाट : सर्वसाधारण (महिला)
सुंदरखेड : अनुसूचित जाती (महिला)
साखळी बु. : सर्वसाधारण (महिला)
मासरुळ : सर्वसाधारण
धाड : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)
रायपुर : सर्वसाधारण (महिला)
देऊळगाव राजा
देऊळगांवमही : सर्वसाधारण
सिनगाँव जहाँगीर : सर्वसाधारण
सावखेड भोई : अनुसूचित जाती
सिंदखेड राजा
साखरखेर्डा : सर्वसाधारण (महिला)
शेंदुर्जन :नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)
किनगांव राजा : सर्वसाधारण
दुसरबीड : अनुसूचित जाती (महिला)
वर्दडी बु. : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)
लाेणार
सुलतानपुर : सर्वसाधारण
वेणी : अनुसूचित जाती
बिबी : सर्वसाधारण
पांग्रा डोळे : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)