Buldana Live नं म्‍हटलं होतं नं तसंच झालंय… धाडच्‍या सरपंचपदी सावित्रीबाई बोर्डे बिनविरोध!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा तालुक्यातील धाडच्या सरपंचपदाची 27 सप्टेंबर रोजी आयोजित निवडणूक कोरम अभावी बारगळली होती. मात्र काही तासांची मुदतवाढ मिळूनही स्टे न मिळाल्याने अखेर आज, २८ सप्टेंबरला निवडणूक बिनविरोध पार पडली. बुलडाणा लाइव्हने केलेले भाकित तंतोतत खरे ठरले अन् सरपंचपदी सावित्रीबाई सत्यवान बोर्डे विराजमान झाल्या. सळधार पावसात फटाक्यांची तुफानी …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा तालुक्यातील धाडच्‍या सरपंचपदाची 27 सप्टेंबर रोजी आयोजित निवडणूक कोरम अभावी बारगळली होती. मात्र काही तासांची मुदतवाढ मिळूनही स्टे न मिळाल्याने अखेर आज, २८ सप्‍टेंबरला निवडणूक बिनविरोध पार पडली. बुलडाणा लाइव्हने केलेले भाकित तंतोतत खरे ठरले अन्‌ सरपंचपदी सावित्रीबाई सत्यवान बोर्डे विराजमान झाल्या.

सळधार पावसात फटाक्यांची तुफानी आतषबाजी करून राष्ट्रवादी काँग्रेस गटाने विजयाचा जल्लोष साजरा केला! गुलालाची उधळण इतकी होती की काही काळ पाऊस रंग रंगीला झाल्याचा धाडवासीयांना भास झाला!! सोमवारी सरपंचपदासाठी सावित्रीबाईंचा एकमेव उमेदवारी अर्ज सादर करण्यात आला होता.

कोरमाभावी काल बारगळलेली सभा आज दुपारी 2 च्या ठोक्याला सुरू झाली. अध्यासी अधिकारी जी. टी. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत भवनात सुरू झालेल्या सभेला 7 सदस्यच हजर होते. मात्र कोरमचा अडसर नसल्याने सभा सुरळीत सुरू झाली अन्‌ संपलीही! मंडळ अधिकारी राऊत यांनी बोर्डे यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. कोसळत्या पावसाच्या साक्षीने मग दीर्घकाळ धाडमध्ये फटाक्यांची आतषबाजी सुरू राहिली…