BULDANA LIVE SPECIAL यंदांच लोकसभेचं इलेक्शन विलक्षण ठरणार! कोण कुठ राहील याचा नाही नेम;

संदीप शेळके अन् रविकांत तुपकरांच्या रूपाने नवे दावेदार रिंगणात उतरण्याच्या तयारीत! खा. जाधव यंदा कसं जमवणार? तिरंगी किंवा चौरंगी लढतीची शक्यता.."या" ४ नावांबद्दल अशी हाय चर्चा....
 
बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभेच इलेक्शन तोंडावर आल हाय..यंदाच हे इलेक्शन विलक्षण होण्याची चिन्ह दिसत हाय.. आतालोकं लय इलेक्शन पाह्यली पन एवढं डेंजर अन् अस्थिर वातावरण नाय पाह्यलं अशा गावगाड्यातल्या ज्येष्ठांच्या प्रतिक्रिया हाय..अर्थात एवढे पावसाळे पाह्यलेल्ल्या लोकांच म्हणणं बरोबर हाय म्हणा..दोन महिन्यांवर इलेक्शन आलं तरी कोणता उमेदवार उभा राहील हे नक्की नाय..आतालोक संदीप शेळके अन् रविकांत तुपकर या नव्या दमाच्या नेत्यांनी इलेक्शन लढायची घोषणा केली पण त्यांचा पक्ष कोणता राहील हे काय अजून ठरेना... दुसरीकंड खासदार प्रतापराव जाधवांच यावेळेस जरा तळ्यात मळ्यातच दिसतया.. भाजपवाले उमेदवार बदला म्हणत्यात.. अन् आपले बुलडाण्याचे संजुभाऊच म्हणत्यात की, "भाजपच्या सर्वेत प्रतापराव जाधव चौथ्या नंबरवर हायती.." आता काय बोलता..?
   त....मुद्दा असा हाय की, खासदारकीच्या निवडणुका येऊ राह्यल्यात.. आतालोक बुलडाणा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय.. पण आता शिवसेना दोन झाल्यात..जो तो आपली शिवसेना खरी असं म्हणतोय..प्रतापराव जाधव शिवसेनेच्या तिकिटावर तीनदा खासदार झालेत, त्याआधी मेहकरात तीनदा आमदारकी गाजवली, राज्यमंत्री पद मिळवलं..२००९ ला नवखे म्हणून त्यांना मतदारांनी स्वीकारलं..२०१४ आणि २०१९ ला त्यांचं मोदीलाटेत जमल असं लोकं म्हणत्यात... महाविकास आघाडी सरकार असताना खा.जाधवांनी भाजपवाल्यांना नको नको ती दूषणं दिली,कुठे गेले अच्छे दिन? कुठे गेला विकास असे सवाल त्यांनीच उपस्थित केलते..गंमत म्हणजे आता त्याह्यलेच मोदी सरकारच्या काळात विकास झाल्याचे दावे करावे लागत हायती..परिस्थीतीच तशी हाय..कारण आता हिंदुत्वासाठी ते भाजपसोबत हाय..त मुद्दा हाय तो त्याह्यच्या तिकिटाचा.. त्यामुळं त्यांचं जरा तळ्यात मळ्यातच हाय..लढलेही शिवसेनेकडून त यंदा जरा जाम घाम गाळावा लागलं.... असं लोकं म्हणत्यात..
   दुसरा मुद्दा आहे तो संदीप शेळकेंचा... राजर्षी शाहू परिवाराच्या माध्यमातून हा माणूस फेमस झालाय.. गावखेड्यातल्या हजारो गरीब, होतकरू तरुणांना या माणसानं पोटापाण्याल लावल.. धनिक मायक्रो फायनान्स च्या माध्यमातून जिल्ह्यातल्या ४० हजार महिलांना छोट्या कर्जाच वाटप केलं..त्यातून अनेक महिलांनी शेळ्या घेतल्या,कुणी पापडाचा उद्योग करतय तर कुणी लोणचं बनवून त्यावर उदरनिर्वाह करतय.. सहकारात चांगल अन् नफ्यात चालू असताना संदीप शेळकेंच्या डोक्यात आता राजकारणात उतरण्याचा प्लॅन घुसलाय.. त्यात काही चुकीचं नाही म्हणा.लोकशाही हाय...पण राजकीय पार्श्वभूमी नाही, पक्ष नाही असं असताना प्रस्थापित लोकांना टक्कर देण्यासाठी हिम्मत लागते..ती हिम्मत त्यांनी दाखवली.. योजनाबद्ध रितीन त्यांचं काम सुरू हाय.. वन बुलडाणा मिशनच्या माध्यमातून जिल्हाभरात सभांचा धडाका सुरू हे.. अन् विशेष म्हणजे हा माणूस मुद्द्याच बोलतो असं लोकांना वाटू लागलंय.. पुढं काय काय होत ते कळलंच.. पण गेम जुळून आलाच तर संदीप शेळकेंच जमू शकतं ....असं लोक म्हणत्यात..
रविकांत तुपकर...हा माणूस त पुऱ्या महाराष्ट्रात फेमस हाय..तस या माणसांचं काम मोठ अन् नावही मोठ.. शेतकऱ्यासाठी हा माणूस कुठंबी हजर असतो..पण एवढं असून राजयोग जरा हुलकावणी देतोय..२०१४ ला झाले असते चिखलीचे आमदार..पण नशीब आडव आलं..त्यानंतर महामंडळ मिळालं...पण काही दिवसांत त्यांच्या नेत्यांन सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यामुळे त्यांनीही लाल दिवा सोडला..२०१९ ला लोकसभा लढतील असं वाटल पण तेव्हाही युती आघाड्यांच्या खेळात कार्यक्रम पांगला..आता मात्र त्यांनी ठरवलंय..काहीही झालं तरी यंदा मेळ जमवायचाच..जिल्ह्यात त्यांनी चांगली कार्यकर्त्यांची टीम उभी केली हाय..या माणसांचं भाषण ऐकायला बम्म गर्दी जमते..यंदा बुलडाण्यात काढलेला एल्गार मोर्चा त लय गाजला... तर मुद्दा हे त्यो..भाऊ कोणत्या पक्षाकडन लढतील..? स्वाभिमानीकडून लढवतील की अपक्ष लढतील...की महाविकास आघाडीकडून की भाजपकडून...सगळी दारं त्यांनी उघडी ठेवलीय..आता त्यांच्यासाठी कोण दार उघडत ते पाहूया...पण यंदा भाऊ फुल फॉर्मात हाय.. आता फक्त आधी सारखं होऊ नये, ऐनवेळेस माघार घ्यायची वेळ येऊ नये म्हणजे मिळवलं.... असं लोक म्हणत्यात...
आता या संभाव्य गर्दीत आणखी एक नाव हाय ते चिखलीच्या नरूभाऊंच...उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ते जिल्ह्याचे संपर्क प्रमुख हाय.. त्याह्यच तिकीट जवळजवळ फायनल हे.. असं त्याह्यचे जवळचे लोक सांगतेत..पण त्याह्यचा पक्ष हाय महाईकास आघाडीत..आता तुम्ही सांगा.. जिल्ह्यातले महाइकास वाले एवढे सोपे वाटले का? त्याह्यच्याकड पण खासदारकीची इच्छा असणारे दावेदार हायेतच की हर्षवर्धन सपकाळांसारखे...निष्ठावान शिवसैनिक आणि सहानुभुती सारख्या मुद्द्यावर आपल जमलं आसं वाटत असेल नरेंद्र खेडेकरांना...पण निष्ठा म्हणजे काय हे आता विचारा नरूभाऊंनाच... असं लोक म्हणत्यात........ तर एकंदरीत यंदाच्या इलेक्शन मधी कोण उमेदवार कोणत्या पक्षात राहील..ज्या ४ नावांची चर्चा केली ते कुठ राह्यतील याचा काही नेम नाही बरं..भो.... कारण ते "इलेक्शन" हायन...असं लोक म्हणत्यात...