BULDANA LIVE BREAKING तब्येत खालावलेल्या तुपकरांना कार्यकर्त्यांनी उचलून गाडीत बसवले! मंत्रालयाचा ताबा घेण्यासाठी सोमठाण्यातून रवाना...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर सोमठाणा येथून मंत्रालयाचा ताबा घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत.
सोमठाणा( ता. चिखली) येथून हजारो शेतकऱ्यांसह तुपकर आज सकाळी ११ वाजता रवाना झाले. यावेळी तुपकर यांची तब्येत खालावली असल्याने कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून गाडीत टाकले. काही झाले तरी मंत्रालयाचा ताबा घेणारच, अडवले तर रक्ताचे पाट वाहतील असे तुपकर यांनी म्हटले आहे. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता.