भाई छोटू कांबळे यांची डेमोक्रॅटिक पार्टी महाराष्ट्र प्रवक्तापदी निवड ; युवांमध्ये उत्साह!भाई छोटू कांबळे यांची डेमोक्रॅटिक पार्टी महाराष्ट्र प्रवक्तापदी नियुक्ती....
Updated: Dec 11, 2024, 20:18 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे साहेब व राज्य अध्यक्ष अजिंक्यभैय्या चांदणे यांच्या आदेशाने बुलढाणा जिल्ह्यातील मातंग समाजाचे युवा नेतृत्व भाई छोटू कांबळे यांची डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ महाराष्ट्रच्या प्रवक्तापदी निवड करण्यात आली आहे.
चौदाव्या वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले छोटू कांबळे हे युवापिढीचे प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांनी वेळोवेळी विविध आंदोलने व संघर्षांमध्ये भाग घेतला असून, समाजातील अन्यायाला वाचा फोडत, कधीही मागे न हटता लढा दिला आहे. त्यांची पार्श्वभूमी व कार्यशक्ती यामुळे पक्षाच्या नेतृत्वाने त्यांची प्रवक्तापदी निवड केली आहे.
प्रा. सुकुमार कांबळे व अजिंक्य चांदणे यांच्या नेतृत्वात छोटू कांबळे हे पक्षाची भूमिका ठामपणे आणि आत्मविश्वासाने समोर ठेवतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील डेमोक्रॅटिक पार्टीचे कार्यकर्ते व मातंग समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.भाई छोटू कांबळे यांच्या नेतृत्वामुळे डेमोक्रॅटिक पार्टीची प्रतिमा आणखी मजबूत होईल आणि समाजाच्या न्यायासाठी ते आणखी प्रगल्भ पद्धतीने लढतील, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या निवडीने सर्वच क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.