BREKING तुपकरांना बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात आणले; पोलीस ठाण्यासमोर प्रचंड फौजफाटा; पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी पोलिसांनी ठाण्यात जाऊ दिले नाही; पेठ फाट्यावर टायर जाळून तुपकरांच्या अटकेचा निषेध

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना थोड्या वेळापूर्वी चाकण करण्यात आली असून त्यांना बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. बुलढाणा शहर पोलीस ठाण्यासमोर सध्या तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. दरम्यान तुपकरांच्या अटकेचे तीव्रप्रसाद जिल्ह्यात उमटायला सुरुवात झाली आहे.
बुलडाणा शहर पोलिस ठाण्यासमोर सध्या प्रचंड फौजफाटा आहे. पोलिस ठाण्यासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दुसरीकडे वार्तांकन करण्यासाठी पोलिस ठाण्यात जाणाऱ्या पत्रकारांना पोलिसांनी रोखल्याने तणाव निर्माण झाला आहे. चिखली खामगाव रोडवरील पेठ फाट्यावर टायर जाळून तुपकरांच्या अटकेचा निषेध नोंदविण्यात आला.