BREKING शरद पवारांच्या निवृत्तीने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्यथित! प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना नाझेर काझी यांनी पाठवला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा
Updated: May 2, 2023, 21:12 IST
सिंदखेडराजा( बाळासाहेब भोसले: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज,२ मे रोजी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. बुलडाणा जिल्ह्याचे अध्यक्ष नाझेर काझी यांनी देखील शरद पवारांना निर्णय बदला अशी मागणी केली आहे.
नाझेर काझी यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्र लिहिले आहे. शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा घेतलेल्या निर्णयाला व्यथित होऊन मी माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. श्रद्धेय साहेबांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी कळकळीची विनंती आहे अन्यथा माननीय प्रांताध्यक्ष यांनी आमचे राजीनामे गृहीत धरावे असे नाझेर काझी यांनी पत्रात लिहिले आहे.