BREKING बुलडाणा लोकसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत २९ टक्के मतदान..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. दुपारी १ वाजेपर्यंत २९.०७ टक्के मतदान झाल्याची माहिती बुलडाणा लाइव्ह ला प्राप्त झाली आहे. आज वर्धा,अकोला, अमरावती, हिंगोली , नांदेड या मतदारसंघातही मतदान होत आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या तुलनेत इतर मतदार संघात दुपारी एक वाजेपर्यंत झालेली मतदान जास्त आहे. वर्धा ३२.३२ टक्के, अकोला ३२.२५ टक्के, अमरावती ३१.४० ,हिंगोली ३०.४६ टक्के , नांदेड ३२.९३ टक्के मतदान झाले आहे.
 बुलडाणा लोकसभा मतदार संघात २०१९ ला ६३. ६० टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदानाची टक्केवारी वाढते की घडते हे संपूर्ण मतदान झाल्यावर संध्याकाळी कळेलच..
.