BREAKING बिगुल वाजला हो... जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण सोडत १३ ऑक्टोबरला! ८ ऑक्टोबरलाच कळणार अनुसूचित जमातीसाठी कोणत्या जागा..
Oct 1, 2025, 18:14 IST
बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दिवाळीनंतर राज्यभरामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचा फटाका फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वांचेच लक्ष लागून असलेल्या जिल्हा परिषद गटांच्या आरक्षणाची सोडत १३ ऑक्टोबरला होणार आहे. दरम्यान त्यापूर्वीच ८ ऑक्टोबरला अनुसूचित जमातीच्या जागांवरील आरक्षणाच्या प्रस्तावास विभागीय मान्यता देणार आहेत. त्यामुळे १३ ऑक्टोबरला अनुसूचित जमातीच्या महिलांच्या आरक्षणाबाबतचा निर्णय होईल, शिवाय नागरिकांचा मागास प्रवर्ग व नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांच्या आर आरक्षणाची सोडत देखील १३ ऑक्टोबरला होणार आहे.
जिल्हा परिषद गटांसाठीचे आरक्षण जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात तर पंचायत समिती गणांसाठीचे आरक्षण १३ ऑक्टोबरलाच तहसीलदारांच्या मार्गदर्शनात होणार आहे. १४ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करतील. १७ ऑक्टोबर पर्यंत आरक्षणावर हरकती घेता येणार आहेत.३१ ऑक्टोबर पर्यंत विभागीय आयुक्त हरकती व सूचनांवर अंतिम निर्णय घेतील.३ नोव्हेंबरला अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध होईल. त्यामुळे ३ नोव्हेंबर नंतर जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे..