BREAKING प्रतापराव जाधव समर्थकांनी गुलाल उधळला, पेढे वाटले..! सकाळपासून खा. जाधवच आघाडीवर; खा.जाधव विजयाच्या समीप? २४ हजार २६० मतांची आघाडी..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी बुलडाणा शहरातील मलकापूर रोडवरील आयटीआय कॉलेजमध्ये सुरू आहे. पहिल्या फेरीपासूनच विद्यमान खासदार प्रतापराव जाधव आघाडीवर आहेत. वृत्त लिहीतेवेळी प्रतापराव जाधव यांनी २ लाख ९५ हजार ८८७ मते घेऊन २४ हजार २६० मतांची आघाडी घेतली आहे. अद्याप जवळपास दोन लाख मतांची मोजणी बाकी आहे. मात्र असे असले तरी खा.प्रतापराव जाधव विजयाच्या समीप पोहचले आहेत. त्यामुळे खा. प्रतापराव जाधव समर्थक प्रचंड जल्लोष करीत आहेत. विरोधी उमेदवारांच्या समर्थकांना फटाके फोडण्याची संधीही खा.जाधव यांनी दिली नाही. मतमोजणी केंद्र समोर सध्या खा.जाधव यांचे समर्थक प्रचंड जल्लोष करीत असून, फटाके फोडणे पेढे वाटण्याचा कार्यक्रम जोरात सुरू आहे. थोड्याच वेळात खासदार प्रतापराव जाधव हे देखील मतमोजणी केंद्रावर दाखल होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.