BREAKING वन बुलडाणा मिशनची परिवर्तन रथयात्रा आजपासून संग्रामपूरात! महिला मेळाव्याने होणार सुरुवात; संग्रामपूर ते सोनाळा निघणार भव्य बाईक रॅली...
Updated: Feb 22, 2024, 16:22 IST
संग्रामपूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वन बुलडाणा मिशनची परिवर्तन रथयात्रा आज,२२ फेब्रुवारीपासून संग्रामपूर तालुक्यात दाखल झाली आहे. १० फेब्रुवारीला या यात्रेला मोताळा तालुक्यातील नळकुंड गावातून सुरुवात झाली होती, त्यानंतर यात्रेने शेगाव तालुका पिंजून काढला. आता आजपासून पुढील ३ दिवस संग्रामपूर तालुक्यातील ७० गावांचा प्रवास ही यात्रा करणार आहे. वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके विकासाचा जागर करणार आहेत.संग्रामपूर येथे आज महिला मेळावा व बाईक रॅलीने परिवर्तन रथयात्रेची सुरुवात होणार आहे.
Add 👆
संग्रामपूर शहरातील नवीन तहसील कार्यालयासमोरील साई हॉटेल मध्ये आज,२२ फेब्रुवारीच्या दुपारी महिला मेळावा होणार आहे. या मेळाव्यात महिलांच्या अडचणींवर मंथन होणार असून जिल्ह्याच्या विकासात महिलांचा हातभार लागावा यासाठी महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर देखील विचारविनिमय होणार आहे. या मेळाव्यानंतर लगेच संग्रामपूर ते सोनाळा अशी बाईक रॅली काढण्यात येणार आहे.
दुष्काळ आणि अवकाळीने ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने स्पेशल पॅकेज मिळाले पाहिजे. संग्रामपूर तालुक्यात संत्रा प्रक्रिया उद्योग सुरू झाले पाहिजे, सोयाबीन - कापसाला अनुक्रमे ८ व १२ हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला पाहिजे यासह अनेक मागण्यां या बाईक रॅलीच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे वन बुलडाणा मिशनच्या कार्यालयीन सूत्रांनी सांगितले.