BREAKING १२ नोव्हेंबरला राहुल गांधी चिखलीत! राहुल बोंद्रे यांच्या प्रचारार्थ घेणार सभा; १९७८ नंतर गांधी परिवारातील सदस्यांची पहिल्यांदा चिखली सभा! राहुल बोंद्रे यांची पत्रकार परिषदेत माहिती....
Nov 9, 2024, 15:34 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा दिवस जसा जसा जवळ येत आहे तस तशी प्रचारातील रंगत वाढत आहे. चिखली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल बोंद्रे यांच्या प्रचारासाठी आता विरोधी पक्ष नेते राहुल गांधी चिखलीला येणार आहेत. १२ नोव्हेंबरला चिखली येथे राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती राहुल बोंद्रे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
१२ नोव्हेंबरला दुपारी बारा वाजता चिखली शहरातील जाफ्राराबाद रोडवरील मैदानात ही जाहीर सभा होणार आहे.१९७८ ला इंदिरा गांधी यांची सभा चिखली येथे झाली होती. त्यानंतर एवढ्या एवढ्या मोठ्या कालावधीनंतर गांधी कुटुंबातील सदस्यांची सभा चिखलीत होणार असून ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे असे राहुल बोंद्रे म्हणाले. या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही राहुल बोंद्रे यांनी केले आहे.