BREAKING आत की बाहेर ! तुपकरांचा फैसला उद्यावर! निर्धार मेळाव्यात तुपकरांनी स्पष्टच सांगितल! निवडणूक स्वतंत्रपणे लढणार!
जर आत गेलो तर... सांगितला पुढचा प्लॅन ..
खा.जाधवांचा घेतला समाचार म्हणाले स्टार्चचे कपडे घालून ट्रॅक्टर चालवणारे "भूमिपुत्र" कसे?
Feb 15, 2024, 15:40 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):रविकांत तुपकर यांच्या जामिनावरचा निकाल उद्या लागणार असल्याची माहिती आहे. आज दुपारी निर्धार मेळावा आटोपून जिल्हा सत्र न्यायालयात तुपकर हजर झाले असता त्यांना उद्याची तारीख देण्यात आली. न्यायालयाचा आदर राखत निकाल मान्य करणार, जर मला अटक झाली तर जेलमधून लोकसभेसाठी अर्ज भरणारच पण आगामी निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा रविकांत तुपकर यांनी केली.
तुपकर यांच्या जामिनावरचा निकाल येण्याआधी आज १५ फेब्रुवारीला दुपारी येथील गर्दे सभागृहात निर्धार मेळावा पार पडला. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या यामेळाव्याला तूपकर समर्थकांची मोठी गर्दी जमली होती. त्यावेळी मुख्य भाषणातून रविकांत तुपकर यांनी जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधींवर देखील निशाणा साधला. खा. जाधवांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, जीन्सची पॅन्ट घालून शेतकरी नेता होता येत नाही तर स्टार चे कपडे घालून ट्रॅक्टर चालवणारे भूमिपुत्र कसे होतील. असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सांगितला पुढचा प्लॅन...
जर आत गेलो तरी तुम्ही पूर्णपणे तयारीत रहा. जागोजागी मेळावे, सभा सुरू असुध्या काहीही झालं तरी ताकदीने आपण मैदानात उतरायचं असे आवाहन तुपकरांनी पदाधिकारी, कार्यकर्ते यांना केले.