BREAKING आ. श्वेताताई महाले, जिल्हाध्यक्ष गणेश मांटे
यांची भाजप बंडखोर विजयराज शिंदेंशी बंदद्वार चर्चा! शिंदेंना प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी उद्या नागपुरात बोलावले
Apr 6, 2024, 21:05 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भाजप नेते विजयराज शिंदे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर महायुतीतील धुसफुस चव्हाट्यावर आली होती. महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या अर्ज भरण्याच्या रॅलीत देखील शिंदे सहभागी झाले नव्हते. दरम्यान बंडाचे निशाण फडकवणाऱ्या विजयराज शिंदेंना उद्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी नागपुरात बोलावले आहे. त्याचा निरोप आज सायंकाळी चिखलीचे आमदार श्वेता ताई महाले पाटील आणि जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश मांटे यांनी विजयराज शिंदेंना दिला.त्यासाठी भाजपचे हे दोन्ही नेते सायंकाळी बुलडाण्यात दाखल झाले होते.
शिस्तबद्ध समजल्या जाणाऱ्या भाजपात बुलढाणा लोकसभा निवडणूक प्रमुख विजयराज शिंदे यांनी अर्ज भरला आहे. शुक्रवारी (दि ५) झालेल्या छानणीत त्यांचा भाजपचा अर्ज बाद झाला, पण अपक्ष म्हणून भरलेला अर्ज आणि बंड खोरी कायम आहे. यामुळे वरील दोन नेत्यांनी आज संध्याकाळी ६ वाजता बुलढाण्यातील विष्णुवाडी स्थित शिंदेंचे निवासस्थान गाठले! या तिघांमध्ये चाललेली दीर्घ चर्चा रात्री ८ वाजता आटोपली. यादरम्यान बावनकुळे यांनी शिंदे व महाले यांच्यासमवेत चर्चा केली. मात्र तोडगा न निघाल्याने शिंदे, महाले ,मानटे, दीपक वारे, यांना थेट नागपुरात पाचारण करण्यात आले आहे. उध्या रविवारी दुपारी बावनकुळे यांच्या निवासस्थानी ही निर्णायक बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.