BREAKING ! उद्या बुलडाण्यातील शाळांना सुट्टी!महाविकास आघाडीच्या आरोपांना आमदार गायकवाड यांचे प्रत्युत्तर! सगळ्या स्मारकांचे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याचा दावा!

जीभ छाटण्याच्या वक्तव्यावर म्हणाले, ते वक्तव्य....

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महापुरुषांच्या स्मारकाचे लोकार्पण कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली आहे. उद्याचा कार्यक्रम लोकोत्सव होणार आहे, ऐतिहासिक होणार आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आमदार गायकवाड यांनी म्हणाले. आज आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.यावेळी ते बोलत होते.
हे देखील वाचा....👇
काल काँग्रेसने पत्रकात परिषद घेऊन स्ट्रक्चरल ऑडिट झाले नसल्याचा आरोप केला होता, मात्र हा आरोप खोटा आहे. सगळ्या स्मारकाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे. या स्मारकांना काँग्रेसच्या लोकांचा विरोध होता, मात्र तो विरोध डावलून आम्ही स्मारकाचे लोकार्पण करत आहोत असे सा.गायकवाड म्हणाले..
त्या वक्तव्याबद्दल म्हणाले...
राहुल गांधी यांची जीभ छाटण्याच्या वक्तव्यावरून आ.गायकवाड यांनी एक पाऊल मागे घेतल्याचे दिसले. आपल्या देशाचा अपमान राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन गेला, त्यामुळे एक देशभक्त नागरिक या नात्याने प्रचंड चीड निर्माण झाली आहे. एक नागरिक म्हणून मी ते वक्तव्य केले, मी ते वक्तव्य आमदार म्हणून किंवा शिवसेना या नात्याने केले नव्हते असेही आ.गायकवाड म्हणाले. राहुल गांधी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे, त्यामुळे त्यांनी चैत्यभूमीवर जाऊन माथा टेकवावा. त्यानंतर मी माझे " ते"विधान मागे घेईल असे आमदार गायकवाड म्हणाले...
उद्या शहरातील शाळांना सुट्ट्या...
उद्या मुख्यमंत्री शहरात असल्याने प्रचंड गर्दी होणार आहे. शाळेत जाणाऱ्या येणाऱ्या मुलांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे उद्या शाळांना सुट्टी देण्यात यावी अशी विनंती आम्ही शहरातील सगळ्या शाळांच्या मुख्याध्यापकांना केली. ती विनंती मान्य करण्यात आल्याचे आमदार गायकवाड म्हणाले...