BREAKING ! राहुल बोंद्रे यांचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न; पोलिसांशी झटापट ! शेतकऱ्यांनी रक्ताच्या सहीने लिहिलेले निवेदन फाटले..
Updated: Sep 19, 2024, 13:25 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्या वेळापूर्वीच बुलडाणा शहरात दाखल झाले आहेत. दरम्यान काँग्रेसने ठरवल्याप्रमाणे जयस्तंभ चौकात निषेध आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहिलेले निवेदन देण्यासाठी राहुल बोंद्रे यांनी वेळ मागितली होती. मात्र प्रशासनाने वेळ दिली नव्हती..अखेर काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे जयस्तंभ चौकात पोहोचले..त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी राहुल बोंद्रे यांना अडवले.
Advt
यावेळी राहुल बोंद्रे यांची पोलिसांशी झटापट झाली. स्वतः एसपी विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी महामुनी राहुल बोंद्रे यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायचेच यावर राहुल बोंद्रे अडून होते. त्यामुळे बोंद्रे यांची पोलिसांशी झटापट झाली, या झटापटीत शेतकऱ्यांनी रक्ताने लिहिलेले निवेदन फाटले..यामुळे राहुल बोंद्रे यांनी संताप व्यक्त केला आहे, ही हुकूमशाही आहे असे राहुल बोंद्रे यांनी म्हटले आहे. राहुल बोंद्रे व त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.