BREAKING ठरल! डॉक्टर राजेंद्र शिंगणे "मोठ्या पवारांकडे"! वाय.बी. सेंटरला शरद पवारांच्या भेटीला दाखल! तुतारी घेणार हाती...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा आणि डॉक्टर राजेंद्र शिंगणे या समीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. आपण शरीराने अजितदादा सोबत आणि मनाने मात्र शरद पवार साहेबांसोबत असल्याचे सुतोवाच अनेक वेळा करणारे माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी पुन्हा एकदा मोठ्या साहेबांकडे अर्थात शरद पवार यांच्याकडे परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सिदखेडराजा विधानसभा मतदारसंघांमध्ये राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. आत्ता हाती आलेल्या वृत्तानुसार डॉक्टर राजेंद्र शिंगणे मुंबईत वाय बी सेंटर येथे शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. त्यामूळे डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी तुतारी घेणार हे जवळपास ठरल आहे...मात्र , महायुतीकडून कुठला उमेदवार लढेल हे अद्याप स्पष्ट नाही..

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजभवनवर सकाळचा शपथविधी झाल्याचे नाट्य घडले होते. त्यानंतर अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या शपथविधीला काही तासांचा काळ उलटत नाही तोच सगळ्यात पहिल्यांदा शरद पवार साहेबांकडे परतणारे जे आमदार होते ते म्हणजे डॉक्टर राजेंद्र शिंगणे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सत्तेत त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. अन्न व औषध प्रशासन खात्याचा कारभार त्यांनी कोरोना सारख्या महाभयंकर महामारी मध्ये चांगल्या रीतीने सांभाळला. एकनाथ शिंदे यांचे बंड झाले आणि सरकार गेले. त्यानंतरही अजितदादा पवार हे फडणवीसांची साथ देत महायुतीमध्ये सामील झाले. तेव्हा जिल्हा बँकेच्या मुद्द्यावरून आणि सॉफ्ट लोन च्या मागणीवरून त्यांनी थेट अजित दादांचा मार्ग स्वीकारला. मात्र तिथेही त्यांचे मन काही रमले नाही. उघडपणे त्यांची वक्तव्य ही गाजत राहिली. आपण शरद पवार साहेबांनाच मानतो हे काही त्यांनी लपवून ठेवले नाही.
काल-परवा मतदारसंघात त्यांनी घेतलेला कार्यकर्ता मेळावा आणि ९०% कार्यकर्त्यांची असलेली मागणी त्यांनी उघडपणे माध्यमांसमोर येऊन सांगितली. त्यामुळे ते शरद पवार साहेबांसोबत जातील हे जवळपास निश्चित झालं होतं. आज ते वाय बी सेंटर येथे शरद पवारांना भेटायला गेले आहेत. त्यामुळे राजेंद्र शिंगणे मोठ्या पवारांकडे परतणार हे जवळपास फायनल मानलं जात आहे...