दोन्ही आमदारांना मतदारांचा हाबाडा!; संग्रामपूर, मोताळ्यात वाचा कोण कुठे विजयी...
मोताळा/संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोताळा आणि संग्रामपूर नगरपंचायतीची यंदाची निवडणूक धक्कादायक अशीच ठरली. संग्रामपुरात भाजपचे आमदार संजय कुटे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असतानाही भाजपला ते एकही जागा जिंकून देऊ शकले नाहीत, तर मोताळ्यात शिवसेनेने राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड यांच्या सभा घेऊन सत्ता काबीज करता आली नाही. संग्रामपुरात प्रहार जनशक्ती पक्षाने दमदार कामगिरी करून तब्बल १२ जागा पटकावल्या आहेत. काँग्रेसला ४ तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला १ जागेवर विजय मिळवता आला. मोताळा नगरपंचायतीत काँग्रेसने सत्ता कायम ठेवत १२ जागांवर विजय मिळवला. शिवसेनेला ४ तर राष्ट्रवादीला एका जागेवर समाधान मानावे लागले. बुलडाणा विधानसभेचे माजी आमदार शिंदेंनी प्रचाराची धुरा सांभाळली, मात्र त्यांना खातेही उघडता आले नाही.
संग्रामपूर नगरपंचायत
प्रहार जनशक्तीचे विजयी उमेदवार ः कविता हरिभाऊ तायडे प्रभाग १, उषा सिद्धार्थ सोनोने प्रभाग २, शेख इरफान शेख इस्माइल प्रभाग ३, शेख कलीमाबी शेख मजीद प्रभाग ६, संतोष काशिनाथ सावतकर प्रभाग ७, नीलेश देविदास मोरखडे प्रभाग ८, खान हमीदाबी आसिफ प्रभाग ११, वैभव सुधाकर गायकी प्रभाग १२, लता अनंता वानखेडे प्रभाग १३, शंकर मोहनलाल पुरोहित प्रभाग १४, अकिलाबानो अयुब शेख प्रभाग १५, लक्ष्मी नारायण वानखेडे प्रभाग १७.
काँग्रेसचे विजयी उमेदवार ः भारत प्रकाश बावस्कर प्रभाग ४, शोभा महेश वानखेडे प्रभाग ५, शेख अफसर शेख अकबर प्रभाग १०, द्वारकाबाई हरिभाऊ राजनकर प्रभाग १६.
शिवसेना ः राजू गौरव गांधी प्रभाग ९
मोताळा नगरपंचायत
काँग्रेसचे विजयी उमेदवार ः शिला कैलास खर्चे प्रभाग २, शेख खातुनबी रशीद प्रभाग ३, मीना सीताराम इंगळे प्रभाग ५, शेख परवीनबी आसिफ प्रभाग ७, माधुरी पुरुषोत्तम देशमुख प्रभाग ८, पुष्पा चंपालाल जैन प्रभाग ९, शेख तस्लीम शेख सलीम प्रभाग १०, हसमतबी जलील खाँ प्रभाग ११, शेख शहनाजबी सलीम प्रभाग १२, रवींद्र देवराव पाटील प्रभाग १३, प्रमोद दादाराव देशमुख प्रभाग १४, सरिता विजय सुरडकर प्रभाग १५
शिवसेनेचे विजयी शिलेदार ः गणेश मनोहर पाटील प्रभाग १, शेख साजिद शेख सुपडू प्रभाग ४, अनिता कैलास झंवर प्रभाग १६ आणि सचिन रामकृष्ण हिरोळे प्रभाग १७.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकमेव विजयी शिलेदार प्रभाग क्रमांक ६ मधून सिंधू शंकर वानखेडे या विजयी झाल्या.