बुलडाण्यात भाजपने जाळला कर्नाटकच्या काँग्रेस नेत्याचा पुतळा! सावरकरांबद्दल अपमानास्पद बोलले होते...
Dec 8, 2023, 20:34 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र ना. प्रियांक खरगे यांनी वि. दा. सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचे जिल्ह्यात पडसाद उमटले. भाजपतर्फे बुलडाण्यात प्रियांक खरगे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. पुतळ्याला चपलांनी बदडण्यात आले.
विर सावरकर यांच्या विषयी कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी केलेल्या वक्तव्याचा बुलड्सण्यात भाजपाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरोधात जोरदार घोषणा दिल्या. यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते
अन्यथा कर्नाटकात घुस
दरम्यान भाजपचे बुलढाणा शहराध्यक्ष अनंता शिंदे यांनी माध्यमाशी बोलताना संतप्त प्रतिक्रिया दिली. खरगे यांनी सावरकर यांच्याबद्धल वक्तव्य बेताल व अवमानजनक असल्याचे ते म्हणाले. बेताल वक्तव्याची जाहीर माफी मागा अन्यथा कर्नाटकात घुसून मंत्री प्रियांक खरगे यांना धडा शिकवू असा इशारा शिंदेंनी दिला.