चिखलीत भाजपला मोठी संघटनात्मक ताकद; काँग्रेस-राष्ट्रवादीतील दिग्गजांसह शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्राच्या विकासाच्या धोरणाला आणि आमदार श्वेता महाले पाटील यांच्या चिखली मतदारसंघातील विकासाभिमुख नेतृत्वाला पाठिंबा देत हे पक्षप्रवेश झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
काटोड्यात काँग्रेसला धक्का; विकास लहाने यांचा भाजपमध्ये प्रवेश
मौजे काटोडा येथील युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष विकास लहाने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र लहाने, सर्जेराव भागिले, अनिल लहाने, सोहम धूड, चेतन धोंडगे, विकास गणेश लहाने, विजय थिगळे, बबलू थिगळे आणि अक्षय धूड यांनीही भाजपची वाट धरली.
या नव्या सहकाऱ्यांच्या प्रवेशाचे आमदार श्वेता महाले पाटील यांनी स्वागत केले. त्यांच्या सहभागामुळे काटोडा परिसरातील संघटनात्मक कामाला तसेच विकास आणि जनसेवेच्या उपक्रमांना अधिक बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादीचे नेते प्रमोद पाटील भाजपच्या गोटात
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रमोदजी पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश करत चिखलीच्या राजकारणात आणखी एक महत्त्वाची घडामोड घडवून आणली. चिखली मतदारसंघाच्या विकासाची दिशा आणि जनसेवेचा संकल्प यावर विश्वास व्यक्त करून आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
प्रमोद पाटील यांच्या राजकीय आणि सामाजिक अनुभवाचा भाजपच्या संघटनात्मक विस्ताराला फायदा होईल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रविकासाच्या संकल्पनेला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाला बळ देत श्वेता महाले यांच्या नेतृत्वाखाली चिखलीच्या विकासासाठी सक्रियपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
रीकी काकडे यांच्या प्रवेशाने युवा शक्ती भाजपसोबत
चिखली युवा काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तसेच सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले रीकी काकडे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत रुपेश काकडे, नीलेश बोथरे, शिवा ढडोरे, प्रज्वल शहाणे, प्रसाद पवार, कृष्णा गाडे, देवा नागरे, साहिल नवरंगी, वासद पठाण, मोहित काकडे, प्रशांत काकडे, विवेक काकडे, नंदकिशोर कोकरे, रितेश जाधव, रोहन तायडे, ओम गायकवाड, शुभम पडघान, आदित्य तेजनकर, कृष्णा कोथळकर, हर्षल गायकवाड, रवी तायडे, श्रावण प्रजापती, कैलास प्रजापती, ललित काकडे, पंकज इंगळे, संदीप देशमाने, दर्शन काकडे, निखिल ठोकणे, अभी महाले, साहेबराव कांबळे आणि अनिल पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.युवा कार्यकर्त्यांच्या या मोठ्या सहभागामुळे चिखली शहरासह मतदारसंघात भाजपच्या संघटनात्मक बांधणीला नवे बळ मिळणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
विकासकामांच्या मुद्द्यावर भाजपचा भर
आमदार श्वेता महाले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली विधानसभा मतदारसंघात रस्ते, पाणीपुरवठा, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील विविध विकासकामांना प्राधान्य दिले जात असल्याचे भाजपकडून नमूद करण्यात आले. विकासकामांना गती देतानाच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने उपलब्ध राहणारे नेतृत्व म्हणून श्वेता महाले यांच्याबद्दलचा विश्वास या पक्षप्रवेशातून दिसून येत असल्याचा दावा करण्यात आला.
नव्या सहकाऱ्यांचे स्वागत करताना आमदार श्वेता महाले पाटील म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या राष्ट्रनिर्माणाच्या विचारांना आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाला साथ देत चिखली मतदारसंघाच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकजुटीने काम करूया.”
या पक्षप्रवेशाच्या वेळी नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख, भाजप तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, शहराध्यक्ष सागर पुरोहित, प्रा. वीरेंद्र वानखेडे, दीपक खरात, दीपक लहाने, राहुल सवडतकर, अंकुशराव पाटील, माजी नगरसेवक विजय नकवाल, नितीन पाटील, प्रशांत देशमुख, सिद्धेश्वर ठेंग, सागर खरात, सुधीर तांबट आदी उपस्थित होते.काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकारी व युवकांचा एकाचवेळी झालेला हा पक्षप्रवेश आगामी काळातील चिखलीच्या राजकीय समीकरणांसाठी महत्त्वाचा मानला जात असून, भाजपने या माध्यमातून संघटन विस्तारासोबतच विरोधकांच्या गोटातही राजकीय धक्का दिल्याचे चित्र आहे.