BIG NEWS शिवसेना नेत्या जयश्रीताई शेळकेंच्या विरोधात बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार..! वाचा कारण काय?

 
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेना नेत्या जयश्रीताई शेळकेंच्या विरोधात बुलडाणा शहरात पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. शिंदेच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या शहर प्रमुख वैशाली ठाकरे यांनी तक्रार दिली आहे..जयश्रीताई शेळके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची बदनामी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे..
एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कामरा कुणाल या स्टँड अप कॉमेडियन ने एक गाणे गायले होते. त्या गाण्याचे समर्थन करीत जयश्रीताई शेळके यांनी ते गाणे सोशल मीडियावर व्हायरल केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने त्यांनी काम केले असून जयश्रीताई शेळके यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची विनंती ठाणेदारांना केलेल्या अर्जात केली आहे..