BIG NEWS हिंदुराष्ट्र सेनेच्या विजय पवारांचा आमदार श्वेताताईंना जाहीर पाठिंबा! म्हणाले, राष्ट्रीय विचारांच्या मताचे विभाजन होऊ नये म्हणून श्वेताताईंची साथ देणार....

 
 चिखली: चिखली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत हिंदूराष्ट्र सेनेच्या वतीने विजय पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र आता विजय पवार यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्वेताताई महाले पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. तसे पत्र देखील विजय पवार यांनी श्वेताताई महाले पाटील यांना सुपूर्द केले आहे. दरम्यान आज,१५ नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेत त्यांनी श्वेताताई महाले पाटील यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा केली. हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होऊ नये म्हणून आपण हा निर्णय घेतल्याचे विजय पवार माध्यमंशी बोलताना म्हणाले...

 पुढे बोलतांना विजय पवार म्हणाले की, मी अपक्ष उमेदवार म्हणून देशहित, धर्महित तसेच हिंदुत्वाकरता निवडणूक लढवत होतो. भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रीय विचारधारा जोपासणारी पार्टी आहे. भाजपा महायुतीच्या उमेदवार श्वेताताई महाले पाटील यांनी गत पाच वर्षात केलेल्या विकास कामामुळे जनता त्यांच्याकडे वळलेली दिसत आहे. गेल्या अडीच वर्षात श्वेताताई महाले पाटील यांनी मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत. श्वेताताई माझ्या लहान भगिनी आहेत, ताईंनी केलेल्या विकास कामांकडे बघून तसेच राष्ट्रीय मतांचे विभाजन होऊ नये याकरिता चिखली विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन ठेवून सौ. श्वेताताई महाले यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे विजय पवार म्हणाले. कोणत्याही अफवांना बळी न पडता या निवडणुकीत हिंदूराष्ट्र सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी श्वेताताई महाले पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन देखील त्यांनी केले असून ते स्वतः श्वेताताई महाले पाटील यांच्या प्रचारात उतरले आहेत.