मोठी बातमी! बुलडाणा शहर पोलिस ठाण्यासमोर रविकांत तुपकर समर्थकांचा ठिय्या! तुपकारांची आजची रात्र कोठडीत?

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पिक विम्याच्या प्रश्नावर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात मुक्काम आंदोलनासाठी ठिय्या मांडलेल्या रविकांत तुपकर यांना बुलडाणा शहर पोलिसांनी थोड्या वेळापूर्वी ताब्यात घेतले. रविकांत तुपकर यांना बुलडाणा शहर पोलिस आणण्यात आले आहे.
बुलडाणा शहर पोलीस ठाण्यासमोर दंगा काबू पथकासह तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान रविकांत तुपकर यांचे समर्थक तसेच शेतकऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या मांडला आहे. पोलिसांनी रविकांत तुपकर यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याची चर्चा आहे, मात्र याबाबत माहिती देण्यास पोलिसांकडून सध्यातरी गुप्तता पाळण्यात येत आहे. तसे असेल तर रविकांत तुपकर यांना आजची रात्र पोलीस कोठडीत काढावी लागू शकते.