मोठी बातमी! सिंदखेडराजातून राजेंद्र शिंगणे यांची माघार! शेवटच्या क्षणी तब्बल १९ जणांनी मैदान सोडले; आता १७ उमेदवार रिंगणात...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संपूर्ण बुलडाणा जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात आज नाट्यमय घडामोडी घडल्या. इथे महायुतीत आता मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून डॉ.शशिकांत खेडेकर व अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मनोज कायंदे रिंगणात कायम आहे. दुसरीकडे राजेंद्र मधुकर शिंगणे नावाच्या एका अपक्ष उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. महाविकास आघाडी कडून डॉ. राजेंद्र शिंगणे रिंगणात आहेत. सिंदखेड राजा मतदारसंघात आता एकूण १७ उमेदवार रिंगणात आहेत.

 उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल १९ जणांनी मैदान सोडले. डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या पुतणी गायत्री शिंगणे रिंगणात कायम आहेत. त्यामुळे त्याचा फटका डॉ.शिंगणे यांना कितपत बसेल यावर आता चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजप नेते डॉ.सुनील कायंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात आता तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे...