BIG BREAKING सिंदखेड राजाचा तिढा सुटला! धनुष्यबाण विरुद्ध तुतारी रंगणार लढत! डॉ.शशिकांत खेडेकर उद्या भरणार उमेदवारी अर्ज...

 
 
Related img.
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आज उद्या म्हणता म्हणता अखेर अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस उजाडण्याआधी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा तिढा सुटला आहे. सिंदखेड राजा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाने आपल्याकडे खेचून आणला असून इथे शिवसेनेकडून डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे. त्यामुळे सिंदखेड राजात धनुष्यबाण विरुद्ध तुतारी अशी लढत होणार असून २५ वर्षानंतर या मतदार संघातून घड्याळ हे चिन्ह हद्दपार होणार आहे..आता थोड्या वेळापूर्वी शशिकांत खेडेकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून एबी फॉर्म देण्यात आल्याचे वृत्त असून शशिकांत खेडेकर उद्या पहाटेपर्यंत सिंदखेडराजात पोहोचणार आहे. उद्या जंगी शक्ती प्रदर्शन करून ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत...