BIG BREAKING रविकांत तुपकरांचे पाऊल पडते पुढे! तुपकरांनी घेतली खासदार संजय राऊत यांची भेट; दोघांमध्ये प्रदीर्घ चर्चा...
Oct 14, 2024, 13:12 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मागील आठवड्यात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. दरम्यान आता रविकांत तुपकर यांना महाविकास आघाडी मध्ये घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या दृष्टीने आज सकाळीच रविकांत तुपकर आणि खासदार संजय राऊत यांची मुंबईत भेट झाली, दोघांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली आहे...
लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून अडीच लाख मते घेतल्यानंतर रविकांत तुपकर यांनी विधानसभा निवडणुकीतही राज्यात २५ जागा लढवणार असल्याचे म्हटले होते. रविकांत तुपकर यांना महाविकास आघाडीत घेतल्यास फायदा होईल असे महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांची म्हणणे आहे, त्यामुळे रविकांत तुपकर यांनी यांना सोबत घेण्यासाठी स्वतः शरद पवार देखील इच्छुक आहेत. मागील आठवड्यात उद्धव ठाकरे यांनी रविकांत तुपकर यांना भेटीसाठी बोलावले होते, त्यावेळी त्यांच्यात विधानसभा निवडणुकी संदर्भात चर्चा झाली होती. दरम्यान आज,१४ ऑक्टोबरला रविकांत तुपकर आणि संजय राऊत यांची भेट झाली आहे..
महाविकास आघाडी सोबत युती करावी अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचे तुपकरांनी म्हटले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला आम्ही सुरवातीला महाविकास आघाडीला प्राधान्य देणार असल्याचं तुपकर यांनी अनेकदा बोलुन दाखवलंय..काही महत्वाच्या जागासाठी तुपकर आग्रही आहेत.आता निर्णय महाविकास आघाडीने घ्यावा अशी तुपकरांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी तुपकरांनी सेना नेते संजय राऊत यांची सामना कार्यालयात भेट घेतली.. दोघांमध्ये बंद द्वार प्रदीर्घ चर्चा झाली आहे. चर्चेचा सविस्तर तपशील अद्याप बाहेर आलेला नाही..