BIG BREKING काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंना पकडण्यासाठी चिखली पोलिसांची शोधमोहीम! राहुल बोंद्रेंसह त्यांचे ५ सहकारी "आऊट ऑफ कव्हरेज"! वाचा राहुल बोंद्रे यांच्या "त्या" सहकाऱ्यांची नावे..
आपल्या दिवंगत वडिलांविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप करीत राहुल बोंद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजप कार्यकर्ते श्याम वाकदकर यांना १७ मार्चच्या सकाळी मारहाण केली होती. वाकदकर त्यांच्या मुलाला परीक्षा सेंटरवर सोडण्यासाठी आले असता ही घटना घडली होती. या मारहाणीत वाकदकर यांच्या कानाचा पडदा फाटल्याचे वाकदकर यांच्याकडून सांगण्यात आले, शिवाय स्वतः राहुल बोंद्रे यांनी आपल्याला दगड मारला असेही वाकदकरांनी पोलीसांकडे दिलेल्या जबाबात म्हटले होते. मारहाण करणाऱ्यानी गळ्यातील मौल्यवान चैन, आणि ५ हजार रुपये असलेले पाकीट लांबवल्याचेही वाकदकरांच्या तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनी रात्री उशिरा राहुल बोंद्रे, कैलास जंगले, विजय गाडेकर, अतरोद्दीन काझी व राहुल बोंद्रे यांचे स्विय सहाय्यक श्लोकानंद डांगे यांच्यासह इतर १२ ते १३ जणांविरुद्ध भादवीच्या कलम ३९५,३९७ ,५०४, ५०६ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. सध्या पोलीस राहुल बोंद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांचा शोध घेत आहेत.