खंडाळा मकरध्वज, एकलारा, पाटोदा आणि पांढरदेव मध्ये आज ५ कोटी रुपयांच्या  विकासकामांचे भूमिपूजन! आमदार श्वेताताईंच्या पुढाकाराने पाणीप्रश्न सुटणार

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले यांनी मतदारसंघात विकासकामांचा धडाका लावलाय. चिखली शहरासह मतदारसंघातील खेड्यापाड्यात विकासाची गंगा पोहचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राज्यात शिंदे - फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून कोट्यवधी रुपयांचा निधी आ. श्वेताताईंनी मतदारसंघात खेचून आणला आहे. आज,२२ फेब्रुवारीला आ. श्वेताताईंच्या हस्ते खंडाळा मकरध्वज, एकलारा ,पाटोदा, पांढरदेव येथे ५ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आ. श्वेताताईंच्या हस्ते होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्याला खा. प्रतापराव जाधवांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

 आज,२२ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता खंडाळा मकरध्वज येथे १ कोटी ८८. ८३ लक्ष रुपयांच्या जलजिवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन होईल. त्यानंतर सकाळी १० वाजता जलजिवन मिशन अंतर्गत एकलारा येथे १ कोटी ९९.५६ लक्ष रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे  भूमिपूजन होणार आहे.

संध्याकाळच्या सत्रात सायंकाळी ६ वाजता पाटोदा येथे जलजिवन मिशन अंतर्गत ७० लक्ष ८५ हजार रुपयांच्या कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न होईल तर संध्याकाळी ७ वाजता पांढरदेव येथे ४२ लक्ष ४९ हजार रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न होईल. आ. श्वेताताईंच्या पुढाकारातून या गावांचा पाणीप्रश्न सुटणार असल्याने गावकरी आनंद व्यक्त करीत आहे.