भाई सिद्धांत वानखेडे म्हणतात,
आरक्षण रद्द करू म्हणणाऱ्या राहुल गांधींची काँग्रेस एक दिवस संपेल, पण आरक्षण संपणार नाही....
Nov 2, 2024, 08:22 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील शोषित, वंचित व मागासवर्गीय समाजाला आरक्षणाच्या रूपाने दिलेले एक सुरक्षा कवच आहे. हे कवच काढू पाहणारी काँग्रेस एक दिवस संपेल, पण आरक्षण संपणार नाही अशा तिखट शब्दात आझाद समाज पार्टीचे चिखली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार भाई सिद्धांत वानखेडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील दलितांच्या आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.
सुमारे तीन महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी वॉशिंग्टन डीसी येथील जॉर्ज टाउन विद्यापीठात एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी भारतातील आरक्षण संपवण्याबाबतचे विधान केले. या विधानावरून देशातील विविध दलित संघटनांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. यासंदर्भात भीम आर्मी आझाद समाज पार्टीचे चिखली मतदारसंघातील उमेदवार भाई सिद्धांत वानखेडे यांच्याशी बातचीत केली असताना त्यांनी राहुल गांधी यांच्या त्या वक्तव्याचा स्पष्ट शब्दात निषेध करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
मागासवर्गीयांची स्कॉलरशिप खाणारे राहुल बोंद्रे दलित विरोधीच...
स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत काँग्रेसने दलित समाजाचा वापर केवळ मतासाठी आणि सत्तेसाठी घेतल्याचे सिध्दार्थ वानखेडे म्हणाले. हीच काँग्रेसचे नीती चिखली मतदारसंघात सुद्धा राबवली जात आहे. येथून निवडणूक निवडणूक लढवणारे कॉग्रेसचे उमेदवार हे या मतदारसंघाचे दहा वर्ष आमदार होते. या काळात त्यांनी दलित समाजासाठी कोणतेही ठोस कार्य केले नाही किंवा शासनाच्या मागासवर्गीयासाठींच्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी मतदारसंघात केली नाही. केवळ गोड गोड बोलून मते लाटायची व सत्ता उपभोगायची हाच एकमेव कार्यक्रम राहुल बोंद्रे यांनी राबवल्याचा आरोप भाई सिद्धांत वानखेडे यांनी केला. त्यामुळे राहुल बोंद्रे हे देखील दलित विरोधी मानसिकतेचे असून त्यामुळेच दलितांना खरे प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी आपण निवडणुकीच्या मैदानात उतरलो असल्याचे पैठणे म्हणाले. अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप २०१५-१६ पर्यंत, विद्यार्थ्यांना न देता, स्वतःच ठेऊन घेत राहुल बोंद्रे यांनी माठा भ्रष्टाचार केला असून या प्रकाराच्या चौकशीची मागणी आपण करणार आहोत असल्याचे भाई सिद्धांत वानखेडे यांनी सांगितले.
दलित मतदार काँग्रेसला धडा शिकवतील
मनुवादी मानसिकतेच्या व दलित विरोधी असलेल्या काँग्रेस पक्षाचा तिटकारा दलित समाजामध्ये निर्माण झाला आहे. त्याची प्रतिक्रिया यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नक्कीच पाहायला मिळेल. चिखली मतदारसंघात सुद्धा काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध सर्व दलित मतदार मोठ्या संख्येने मतदान करून काँग्रेसला धडा शिकवतील असा ठाम विश्वास आजच समाज पार्टीचे उमेदवार भाई सिद्धांत वानखेडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला...