EXCLUCIVE बुलडाण्यात विजयराज शिंदेंकडून बॅनरबाजी; भावी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा उल्लेख; महायुतीच्या पाच आमदारांचे फोटो टाकले, पण संजय गायकवाडांना वगळले....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यात महायुतीचे बहुमताचे सरकार आले आहे. अद्याप मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. अशातच भाजपा आणि शिवसेनेकडून आपापल्या नेत्यांचे नाव भावी मुख्यमंत्री म्हणून घेण्यात येत आहे, तशी बॅनरबाजी सुद्धा दोन्ही पक्षाकडून राज्यभरात होत आहे.. आता बुलडाण्यात भाजप नेते विजयराज शिंदे यांनी लावलेल्या बॅनरची चर्चा होत आहे. विजयराज शिंदे यांनी लावलेल्या बॅनरवर देवेंद्र फडणवीस यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख आहे.. "आ रहे है भगवा धारी राज तिलक की करो तयारी" असा मजकूर या बॅनरवर आहे.. विशेष म्हणजे या बॅनर महायुतीच्या जिल्ह्यातील सहापैकी पाच आमदारांचे फोटो आहेत..मात्र बुलडाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांचा फोटो मात्र विजयराज शिंदे यांनी टाळला आहे...

निवडणुकीच्या आधीही संजय गायकवाड आणि विजयराज शिंदे यांच्यामध्ये युद्ध पेटले होते. विजयराज शिंदे यांनी भाजपकडे मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी देखील मागितली होती. मात्र शिंदे यांना परवानगी नाकारण्यात आली होती.. शिवाय विजयराज शिंदे यांच्याकडे अमरावती जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. दरम्यान पुन्हा एकदा संजय गायकवाड यांचा बुलडाण्यात विजय झाला. जिल्ह्यात सात पैकी सहा जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. विजयराज शिंदे यांनी लावलेल्या बॅनरवर महायुतीच्या विजयी शिलेदारांचे देखील अभिनंदन करण्यात आले आहे. त्यावर चैनसुख संचेती, संजय कुटे, आकाश फुंडकर श्वेताताई महाले, मनोज कायंदे यांचे फोटो लावण्यात आले आहेत मात्र विजयराज शिंदे यांनी संजय गायकवाड यांचे अभिनंदन करणे टाळले आहे.. आता या बॅनरची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे...