संतापजनक.! वादळामुळे झोका उडून मृत पावलेल्या सईच्या कुटुंबियांना ४ लाखांचा चेक दिला,पण खात्यात पैसेच नाही? ना.प्रतापराव जाधवांच्या हस्ते दिला होता धनादेश; चिखलीचे तहसीलदार म्हणाले, मला माहिती नाही ...
पूर्वनियोजित सत्काराचे कार्यक्रम बाजूला ठेवून केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी संवेदनशीलता दाखवत १५ जून रोजी देऊळगाव घुबे येथे भेट दिली होती. त्यावेळी चिखली तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थित ना.प्रतापराव जाधव यांच्या हस्ते सईच्या कुटुंबियांना ४ लाखांचा धनादेश देण्यात आला होता. मात्र संबधित खात्यात पैसे नाही का? असा सवाल उपस्थित झाला आहे. कारण सईच्या कुटुंबियांना सध्या चेक लावू नका असे सांगण्यात आल्याचे त्यांनी बुलडाणा लाइव्ह शी बोलतांना सांगितले.
पांडेबाचा फोन आला ...
दरम्यान मदतीचा चेक सईच्या कुटुंबियांना सुपूर्द करीत असताना फोटोसेशन करण्यात आले. माध्यमांमध्ये बातम्याही छापून आल्या.मात्र दुसऱ्याच दिवशी मृतक सईच्या कुटुंबियांना गावातील तलाठ्याच्या आणि तहसील कार्यालयातून फोन आला. तुम्हाला मदतीचा चेक दिला आहे मात्र तो सध्या लावू नका, त्या खात्यात सध्या पैसे नाही असे सांगण्यात आल्याचे मृतक सईचे वडील भारत साखरे यांनी "बुलडाणा लाइव्ह" शी बोलतांना सांगितले.
चिखलीचे तहसीलदार म्हणाले...
दरम्यान या संतापजनक आणि चीड आणणाऱ्या प्रकारानंतर बुलडाणा लाइव्ह ने चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे यांचे म्हणणे जाणून घेतले.यावेळी तहसील काकडे यांचे उत्तर चक्रावून टाकणारे होते. मी दोन तीन दिवसांपासून सुट्टीवर होतो. मला याविषयासंदर्भात काहीही माहिती नाही. मी माहिती घेऊन सांगतो असे ते म्हणाले. यावर बुलडाणा लाइव्हने संबधित खात्यात कधी पैसे पडतील?
याची आता माहिती मिळू शकत नाही का असे विचारले असता आताच्च कशी माहिती देऊ..उद्या देतो असे सांगितले.