अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आ. श्वेताताईंच्या घरी.....कारण काय?
Sep 9, 2024, 08:53 IST
मुंबई(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल,८ सप्टेंबरला चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. आ. श्वेताताई यांच्या मुंबईतील निवासस्थानी दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. त्यानिमित्ताने दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आ.महाले यांच्या निवासस्थानी दाखल झाले.
यावेळी महाले दांपत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. आ. श्वेताताई महाले यांच्या मुंबईतील निवासस्थानी दीड दिवसांच्या बाप्पाचे दरवर्षी आगमन होत असते.या दरम्यान आ. श्वेताताईंच्या घरी उत्सवाचे वातावरण असते.याच उत्सवात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी देखील आ. श्वेताताईंचे घर गाठले.