BREAKING खामगावातून अमोल अंधारेंची माघार! म्हणाले, हिंदुत्वाच्या मतांचे विभाजन होऊ नये म्हणून निर्णय....

 
  
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान खामगाव विधानसभा मतदारसंघातून हिंदुत्ववादी नेते अमोल अंधारे यांनी माघार घेतली आहे. अंधारे यांनी अर्ज भरल्यामुळे विद्यमान आमदार आकाश फुंडकर यांच्या अडचणी वाढल्या होत्या, मात्र आता अंधारे यांनी माघार घेतल्याने फुंडकर यांना दिलासा मिळाला आहे.
 
 हिंदुत्ववादी मतदारांच्या मतांचे विभाजन होऊ नये. देशात आणि राज्यात हिंदुत्वाच्या विचारांचे सरकार आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या उमेदवारीमुळे हिंदुत्ववादी मते विभाजित झाली असती त्यामुळे आपण हिंदूहितासाठी हा निर्णय घेतल्याचे अमोल अंधारे यांनी म्हटले आहे...