ऑल इंडिया पॅंथर संघटनेचा रविकांत तुपकरांना पाठिंबा; भाई दिपक केदार स्वत: भिडणार प्रचाराला; तुपकरांची ताकद वाढली...
Apr 19, 2024, 18:47 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आंबेडकरी विचारांनी प्रेरीत असलेल्या आणि जिल्हाभर मोठे संघटन असलेल्या ऑल इंडिया पॅंथर संघटनेने सर्वसामान्य जनतेचे उमेदवार रविकांत तुपकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. ऑल इंडिया पॅंथर संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तुपकर यांच्या विजयासाठी जिवाचे रान करतील, असा विश्वासही संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई दिपक केदार यांनी दिला आहे. शिवाय भाई दिपक केदार रविकांत तुपकर यांच्या प्रचारालाही भिडणार आहेत त्यामुळे निश्चितच रविकांत तुपकरांची ताकद वाढली आहे.
Advt.👆
ऑल इंडिया पॅंथर संघटनेचे अध्यक्ष भाई दिपक केदार यांनी लेखी पत्राद्वारे रविकांत तुपकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच एका व्हीडीओ क्लिपच्या माध्यमातून सोशल मीडियावर देखील त्यांनी पाठिंबा जाहीर करुन ऑल इंडिया पॅंथर संघटनेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचे आदेश दिले आहे. रविकांत तुपकर हे गेल्या २२ वर्षांपासून कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, तरुण, महिला व सामान्य जनतेसाठी प्रामाणिकपणे लढा देत आहेत. समतेचा विचार घेऊन तुम्ही पुढे जात आहात. जनसामान्यांचा उमदेवार म्हणून बुलडाणा लोकसभेची निवडणूक लढवित आहात, तुम्हाला ऑल इंडिया पॅंथर संघटनेचा सक्रीय पाठिंबा जाहीर करत आहे. सर्व संघटना पूर्ण ताकदिनीशी तुमच्या सोबत आहे. तुम्हाला विजयी करण्यासाठी आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते जिल्हाभर प्रत्येक घटकात प्रचार करुन तुम्हाला पाठबळ देऊ, असे भाई दिपक केदार यांनी पत्रात नमुद केले आहे. तसेच एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी सोशल मीडियावर देखील आपला पाठिंबा जाहीर करुन कार्यकर्त्याना प्रचाराला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच भाई दिपक केदार हे स्वत: देखील रविकांत तुपकर यांच्या प्रचाराला भिडणार आहेत त्यामुळे निश्चितच रविकांत तुपकरांची ताकद वाढली आहे.