व्हाईस ऑफ मीडियाच्या विभागीय कार्याध्यक्षपदी अजय बिल्लारी! लक्ष्मीकांत बगाडेंकडे राज्य कार्यवाहक पदाची जबाबदारी! राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळेंची घोषणा...
Jan 9, 2025, 16:29 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पत्रकार आणि पत्रकारितेसाठी काम करणाऱ्या "व्हाईस ऑफ मीडिया" संघटनेच्या नवीन नियुक्त्या राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी जाहीर केल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्यात आपल्या पत्रकारितेचा ठसा उमटवणाऱ्या अजय बिल्लारी यांची विभागीय कार्याध्यक्षपदी तर जिल्हाध्यक्ष पदाची समर्थपणे जबाबदारी सांभाळणारे लक्ष्मीकांत बगाडे यांची राज्य कार्यवाहक पदी नियुक्ती करण्यात आली आहे..
पत्रकारांचे आरोग्य, शिक्षण, घर यासह पत्रकारांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी व्हॉइस ऑफ मीडिया काम करत आहे. गेल्या तीन वर्षात संघटना आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली असून जगातील ४९ देशांमध्ये व्हाईस ऑफ मीडियाचे सदस्य आहेत. भारतात देखील सर्वाधिक सदस्य व्हाईस ऑफ मीडियाचे आहेत. सध्या व्हाईस ऑफ मीडियाचा "संघटनात्मक बांधणी पंधरवाडा" सुरू आहे. बुलडाणा जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे यांनी बुलडाणा जिल्ह्यात संघटनेची उत्कृष्ट बांधणी करून विविध उपक्रम राबवले आहेत, त्यांच्या कार्याचा सन्मान करीत त्यांना आता राज्य कार्यवाहक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. अजय बिल्लारी यांना विदर्भ विभागीय कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.. आपल्याला दिलेली जबाबदारी आपण पार पाडाल, आपल्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या सर्व ठिकाणी आपण पदाधिकाऱ्यांची निवड करावी व संघटनेच्या कामास गती द्यावी असे म्हणत राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी अजय बिल्लारी आणि लक्ष्मीकांत बगाडे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.