प्रचार नंतर आधी शेतकरी महत्वाचा! खा. प्रतापराव जाधव पोहचले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर; शेतकऱ्यांना दिला धीर..

 
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने सर्वच उमेदवार प्रचारात व्यस्त आहेत. मात्र या धामधुमीत  देखील महायुतीचे उमेदवार तथा खा.प्रतापराव जाधव यांनी प्रचार बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्याला प्राधान्य दिले. काल, अवकाळी पाऊस आणि गारपीटीने नुकसान झालेल्या खामगाव तालुक्यातील गणेशपुर, पाळा, निमखेड येथील शेतकऱ्यांच्या बांधावर खा.जाधव पोहचले. यावेळी नुकसानीची पाहणी करून खा.जाधव यांनी शेतकऱ्यांना धीर दिला व मदतीसाठी पाठपुरावा करण्याचा शब्द दिला. यावेळी भूमिपुत्र ही उपाधी खा.जाधव यांनी सार्थ ठरवली अशा प्रतिक्रिया उपस्थित शेतकऱ्यांमधून व्यक्त होतांना दिसल्या.

 

काल, ९ एप्रिलला खामगाव तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. ज्वारी, टोळाचा कांदा या पिकांचे नुकसान झाले. काही ठिकाणचे शेडनेट उध्वस्त झाले व पशुहानी झाली. खा.प्रतापराव जाधव यांनी  पूर्वनियोजित प्रचार दौरा बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.  याआधी लोणार, मेहकर, सिंदखेडराजा, देऊळगावराजा तालुक्यात अवकाळीने थैमान घातले असता खा.प्रतापराव जाधव यांनी पडत्या पावसात सर्वात आधी शेतकऱ्यांच्या बांधावर धाव घेतली होती. केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करून खा.जाधव यांच्या प्रयत्नातून नोव्हेंबरच्या अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. दरम्यान आज देखील खा.जाधव यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क करून तातडीने पंचनामे करून वरिष्ठांना  अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितांचे निर्णय घेणारे सरकार आहे, अनेक योजना शेतकरी हिताच्या राबवल्या जात आहेत.

Advt. 👆

त्यामुळे काळजी करू नका, सरकार तुमच्या सोबत आहे. या नुकसानीची भरपाई तातडीने मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करू असा शब्द यावेळी खा.जाधव यांनी दिला. यावेळी त्यांच्यासोबत  आ. आकाश फुंडकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे, भाजपा ता अध्यक्ष विलासराव काळे, शिवसेना खामगाव  ता.प्रमुख राजेंद्र बगे, युवासेना ता प्रमुख बहादूर वागे, शिवसेनेचे भास्करराव राऊत , नयन टिकार, गोपाल चव्हाण,सचिन राऊत विशाल धांडे,शेख आसीप,पवन मोसे  उपस्थित होते.