दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! मलकापुरातून भाजपकडून मनिष लखानींचे नाव जोरदार चर्चेत; राजेश एकडेंचा अभ्यासक्रम ऐनवेळी बदलणार...

 
मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भाजपने काल,२० ऑक्टोबरला आपल्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. बुलडाणा जिल्ह्यात भाजपच्या वाट्याला ४ जागा जात आहेत. त्यातील विद्यमान ३ आमदारांच्या उमेदवारीची घोषणा कालच झाली..आता जिल्ह्यात केवळ मलकापूरच्या उमेदवारीची घोषणा बाकी आहे..चैनसुख संचेती आणि काँग्रेस मधून भाजपात आलेले शिवचंद्र तायडे यांच्यातील वाद कमालीचा विकोपाला गेला आहे. भाजपसारख्या शिस्तबद्ध पक्षाला हे शोभणारे नाही..त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठी मलकापुरात धक्कातत्रांचा अवलंब करण्याची दाट शक्यता आहे. भाजपकडून युवा चेहरा म्हणून मनिष लखानी यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे...
 विशेष म्हणजे मनिष लखानी यांचे नाव समोर येताच आता मतदारसंघातून देखील लखानी यांनाच उमेदवारी मिळावी असा सूर जनमानसातून उमटू लागला आहे. मनिष लखानी यांचे नाव संपूर्ण मतदारसंघाला परिचित आहे.गावोगावी असलेला संपर्क लखानी यांचेसाठी जमेची बाजु ठरणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून लखानी परिवार सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहे. त्यामुळे मनिष लखानी यांची कोरी पाटी, स्वच्छ प्रतिमा, तरुण चेहरा या बाबी लक्षात घेता लखानी यांचे नाव उमेदवारीच्या स्पर्धेत अग्रक्रमावर आहे..
 दोघांना राहूद्या..मनिष लखांनींना उमेदवारी द्या...
मलकापूर मतदारसंघात चैनसुख संचेती आणि शिवचंद्र तायडे यांच्यात कमालीचे वाद आहेत. अगदी शिवराळ भाषेचा वापर होईपर्यंत हा वाद टोकाला पोहोचला आहे. दोघांपैकी कुणाला उमेदवारी मिळाली तरी भाजप कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत सापडतील. अशा स्थितीत मनिष लखानी यांचे नाव भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांकडून पुढे करण्यात येत आहे. लखानी यांना उमेदवारी मिळाल्यास गटातटात विभागलेली भाजपा एका ठिकाणी येऊ शकते. शिवाय विद्यमान आ.राजेश एकडे यांच्यासमोर मनिष लखानी यांच्या रूपाने अभ्यासक्रमच बदलणार आहे.त्यामुळे लखानी हे सक्षम उमेदवार ठरतील अशी चर्चा जोर धरू लागली आहे..