सिनेअभिनेता गोविंदा आज चिखलीत! खा.प्रतापराव जाधवांच्या प्रचारार्थ भव्य रोड शो.! 

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महायुतीचे स्टार प्रचारक चित्रपट अभिनेता गोविंदा आज चिखली शहरात येत आहेत. खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ गोविंदा रोड शो करणार आहेत, यावेळी चिखलीकरांसह जिल्ह्यातील गोविंदाचे चाहते गोविंदाची एक झलक पाहण्यासाठी तुडूंब गर्दी करणार असल्याची शक्यता आहे.
Advt.👆
रोड शो सायंकाळी ४ वाजेच्या दरम्यान होणार आहे. या वेळी त्यांच्या सोबत महायुतीचे उमेदवार खा.प्रतापराव जाधव, आमदार श्वेताताई महाले उपस्थित राहणार आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ चिखली विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार श्वेताताई महाले यांच्या मार्गदर्शनात प्रचाराचा झंजावात सुरू आहे. आता मतदानाला काही दिवसच बाकी असल्याने प्रचाराचा धुरळा प्रचंड प्रमाणात उडत असल्याचे चित्र आहे. महायुतीचा प्रचार हा जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहचावा या उद्देशाने महायुतीचे सर्वच आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख, दिवसाची रात्र करीत आहेत. आता प्रचाराचा वेग आणखी वाढवित महायुतीच्या वतीने चित्रपट अभिनेता गोविंदा यांच्या रोड शोचे आयोजन चिखली शहरात करण्यात आले आहे. यावेळी त्यांच्यासोबत महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री, राजेंद्र शिंगणे, संजय कुटे, संजय रामुलकर, आकाश फुंडकर, संजय गायकवाड, श्वेता महाले, माजी आमदार सर्वश्री विजयराज शिंदे, तोताराम कायंदे, धृपतराव सावळे, शशिकांत खेडेकर, यांच्यासह मित्र पक्षाचे सर्वश्री विठ्ठल लोखंडकार, नाझीर काझी, विनोद वाघ, गणेश मान्टे, सचिन देशमुख, नरहरी गवई, शांताराम दाणे, बळीराम मापारी, ओमसिंग राजपुत, योगेंद्र गोडे, विजय गवई, तुषार काचकुरे, नाना पाटील प्रभाकर डोईफोडे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आठवले गट, रासप, पिरीपा कवाडे गट, व मित्र पक्षांच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. चिखली शहरातील जयस्तंभ चौकातून या रोड शोचा प्रारंभ होणार आहे.