सिंदखेडराजात ट्विस्ट! योगेश जाधवांना महायुतीची उमेदवारी? मतदारसंघात चर्चा जोमात...
Oct 17, 2024, 19:10 IST
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्याच्या एका टोकाला असले तरी राजकीय घडामोडीत सध्या केंद्रस्थानी असलेल्या सिंदखेडराजा मतदारसंघात नवनवीन घडामोडी घडत आहेत.डॉ.राजेंद्र शिंगणे शरद पवार गटाच्या उंबरठ्यावर असताना आता महायुतीचे उमेदवार कोण? या विषयावर जोरदार चर्चा मतदारसंघात झडत आहेत..महायुतीकडून तरुण चेहरा म्हणून योगेश जाधव यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे..त्यासाठी आवश्यक ती सर्व "फिल्डिंग" योगेश जाधव यांच्याकडून लावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले..पुढच्या एक दोन दिवसांत यासंबंधीचा निर्णय होऊ शकतो..
योगेश जाधव यांनी मतदारसंघातील गाव अन् गाव पिंजून काढले आहे. वेगवेगळे उपक्रम देखील त्यांनी राबवले.त्यामुळे मतदारसंघात योगेश जाधव यांनी चांगली बांधणी केली आहे. आता डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी महायुती सोडल्याचे जवळपास निश्चित असल्याने महायुतीत हा मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेला सुटण्याची शक्यता अधिक आहे. अशा स्थितीत योगेश जाधव यांची दावेदारी अधिक प्रबळ मानली जात आहे..तिकीट आपल्यालाच मिळणार असा दावा योगेश जाधव यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. शिवसेनेकडून मतदारसंघात झालेल्या वेगवेगळ्या सर्वेत देखील जाधव यांचे नाव समोर असल्याचे सांगण्यात येत आहे. अशात आता योगेश जाधव यांना उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत...अर्थात राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही हेही तेवढेच खरे....