BREAKING बुलडाण्यात भगवी लाट...! अंबादास दानवे, खा.अरविंद सावंत बुलडाण्यात पोहचले; आक्रोश मोर्चाला जल्लोषात सुरुवात...
Sep 23, 2024, 13:07 IST
बुलडाणा(बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्या संकल्पनेतील आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. गावागावातील शेतकऱ्यांची फौज बुलढाणा शहरात दाखल झाली आहे. खासदार अरविंद सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या मोर्चासाठी शहरात पोहोचले आहेत. बुलडाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीने दोन्ही नेत्यांचे दमदार स्वागत करण्यात आले आहे. जिजामाता प्रेक्षागार मैदाना जवळील टिळक नाट्य मंदिराच्या मैदानातून आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. हा आक्रोश मोर्चा संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजार गल्ली, कारंजा चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
या आक्रोश मोर्चाने बुलडाणा शहर दणाणले असून एकंदरीत भगवी लाट उसळल्याचे चित्र आहे.विविध देखावे, बैलगाड्या, भगवे दुप्पटे,झेंडे यामुळे मोर्चाचा वेगळाच माहोल तयार झाला आहे. विशेष म्हणजे या मोर्चात अग्रभागी महिला आहेत.