व्वा रे मोदी तेरा खेल,सस्ती दारू महंगा तेल! चिखलीत राहुल बोंद्रे कडाडले! काँग्रेसचे महागाईविरोधात आंदोलन!

 
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "व्वा रे मोदी तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल" या व अशा अनेक केंद्र सरकार विरोधी घोषणांनी आज चिखली शहरातील बसस्थानक परिसर आज दणाणून गेला होता. निमित्त होते चिखली तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या विरोधातील महागाई विरोधातील आंदोलनाचे! यावेळी राहुल बोंद्रे यांनी वाढत्या महागाई मुळे सामान्यांचे जीने मुश्कील झाले असून सरकार मात्र राजकारण करण्यात व्यस्त असल्याचा आरोप केला. यावेळी बैलगाडीवर मोटारसायकलची प्रेतयात्रा काढून महागाईविरोधातील या आंदोलनाने साऱ्यांचेच लक्ष वेधले.

केंद्र सरकारवर महागाई वाढवून सामान्य जनतेला लुटत आहे. पेट्रोल,  डिझेल, एलपीजी गॅस च्या किमती प्रचंड वाढल्यात. सिएनजी आणि पीएनजी गॅसही महागला आहे.  उज्वला गॅस योजना बंद झाली असून सबसिडी मिळणे बंद झालेय. देशांत दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत असताना  अंबानी आणि अदाणी मालामाल कसे होतात असा सवाल राहुल बोंद्रे यांनी यावेळी केला. जनता महागाईने भरडल्या जात असताना मोदी आणि शहा झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोपही यावेळी बोंद्रे यांनी केला.

या आंदोलनात चिखली तालुका कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष समाधान सुपेकर, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष दिपक देशमाने, डॉ. मोहमंद इसरार, महिला कॉग्रेसच्या अध्यक्षा सौ. संगिताताई गाडेकर, शहर अध्यक्षा सौ. विद्याताई देषमाने, युवक कॉग्रेसचे शहर अध्यक्ष पप्पु जागृत, सचिन बोंद्रे, कुणाल बोंद्रे, ज्ञानेश्वर सुरूशे, राम डहाके,  आसिफ हाजी रउफ, दिपक खरात, गोपाल देव्हडे, विजय गाडेकर, दिपक थोरात, राजु रज्जाक, गोकुळ शिंगणे, निलेष अंजनकर, अमिनखॉ उस्मान खॉ, प्रदिप अंभोरे, किशोर कदम, प्रदिप पचेरवाल, दिलीप पाटील,  ईश्वर इंगळे, आत्माराम देशमाने,  प्रमिलाताई जाधव, विजय पाटील शेजोळ,  प्रशांत देशमुख, बाळु साळोख, जय बोंद्रे, साहेबराव पाटील,  डॉ. संजय घुगे, सौ. अनिता घुगे, खलील बागवान, अकरम बागवान, अजिम  खान, कैलास खराडे, डॉ. अमोल लहाने, विजय जागृत,अकील खान, दत्ता करवंदे, रामेश्वर भुसारी, 

रामकृष्ण कापसे,  प्रविण पाटील, शेख जाकीर, अक्रम खासाब, संजय गिरी, राजु बावस्कर, शिवा म्हस्के, प्रभाकर कपाटे, प्रदिप सावळे, आनंथा जाधव, मो.सादीक, शकील खॉ, रफिक मेबर, शाम ठोंबरे, भास्कर चांदोरे, नरेश शीपणे, प्रकाश राठोड, लक्ष्मण भिसे, श्रीकांत पवार, सुषांत ढोरे, भागवत कानडजे, प्रताप साळोख, गोपाल काळे, विशाल साबळे, अमोल सोनुने, अमोल पठारे, रविंद्र सोनटक्के, राजु जंवजाळ, देविदास शिंगणे, सौ. रत्ताबाई वानखेडे, पांडुरंग कापसे, शिवदास कापसे, बाशिद जमदार, सैयद सरदार, जावेद खॉ, शेख आसिफ, शेख समीर, पवन रेठे, उमेश खरे यांच्यासह कॉग्रेस पक्षाचे विविध विभाग व सेलचे पदाधिकारी तथा असंख्य कार्यकर्ते उपस्थिीत होते.