ज्यांच्या बापाने शेकोट्या पेटवल्या नाहीत ते काय महाराष्ट्र  पेटवणार?! मी मर्द माणूस! तलवारी अंगावर झेलल्या! आमच्याबद्दल जो बोलणार त्याला चोपणारच! आमदार संजय गायकवाड पुन्हा आक्रमक..!!

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आपल्या आक्रमक स्वभावाने राज्यभरात चर्चेत असणारे बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे  आमदार पुन्हा एकदा चर्चेत आहेत. दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या कार्यक्रमात आमदार गायकवाड समर्थकांनी धुडघुस घालत ठाकरे गटांच्या नेत्यांना बेदम चोप दिला होता. त्यानंतर आमच्या नेत्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना "चून चून के मारेंगे" असे विधान आ. गायकवाडांनी केले होते. आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत असे म्हणत  ठाकरे गटाच्या  राज्यातील व जिल्ह्यातील नेत्यांनी सुद्धा आ. गायकवाड यांच्या विरोधात ठिकठिकाणी निदर्शने करीत महाराष्ट्र पेटून उठेल अशी भाषा केली होती. दरम्यान निदर्शने करणाऱ्यांना पुन्हा एकदा आ. गायकवाडांनी फैलावर घेतले आहे. ज्यांच्या बापांनी कधी शिकोट्या पेटवल्या नाहीत ते काय महाराष्ट्र पेटवणार? ज्यांनी कधी खटमल मारल नाही, कधी थप्पड मारली नाही ते काय करता ते पाहूनच घेतो. मी मर्द माणूस आहे , तलवारी अंगावर झेलल्या आहेत असे आक्रमक विधान आमदार गायकवाडांनी केले आहे.

 आम्ही ठरवलं असतं तर त्याच दिवशी दोनशे तीनशे जणांचा बंदोबस्त झाला असता. मात्र आम्हाला तंटा नको होता.आमच्या नेत्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना चोपणारच असेही आ. गायकवाड म्हणाले. ज्यांना खुमखुमी आहे त्यांना आमचे कार्यकर्ते उत्तर देतील. मी मर्द माणूस आहे, तलवारी अंगावर झेलल्या आहेत. माझ्यावर १५० केसेस आहेत. पस्तीस वर्ष मी संघर्ष केलाय, तुम्ही काय केलं असा सवालही आ.गायकवाड यांनी केला. 
  
जालिंधर बुधवंत यांनी मी पद दिलं..

 माझ्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाच्या लोकांनी जिल्ह्यात काही ठिकाणी मोर्चे काढले. त्या मोर्चात काही ठिकाणी राष्ट्रवादीचे नगरसेवक होते. याला मोर्चा म्हणावे का? जालिंधर बुधवंत यांना मी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद दिले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केले. माजी आमदार त्यांना मारायला जात होतो तेव्हा मी त्यांना वाचविण्यासाठी जात होतो असेही आ. गायकवाड म्हणाले.