सिंदखेडराजाच्या रामेश्वर मंदिराची भिंत पावसामुळे पडली!  आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी तातडीने काय केले वाचा..!

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिदखेडराजा येथील रामेश्वर मंदिराची भिंत पावसाने पडली. माजी मंत्री आ. डॉ राजेंद्र शिंगणे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. 

भिंत त्वरित दुरुस्त करण्यात यावी यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. उपविभागीय अधिकारी व सिंदखेडराजा तहसीलदार यांना फोन करून तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी मंदिराचे अध्यक्ष बाळू म्हस्के. विजय तायडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सतीश काळे, सिताराम चौधरी, संजय मेहेत्रे ,मंगेश खुरपे उपस्थित होते.