पक्षसंघटनेसाठी झोकून काम करण्याचा परिणाम! देवानंद पवार झाले मेहकर तालुका काँग्रेस कमिटीचे सलग तिसऱ्यांदा अध्यक्ष..!
( जाहिरात👆🏻 )
देवानंद पवार यांनी मेहकर तालुक्यात पक्षसंघटन मजबूत केले आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरून सूचित करण्यात आलेल्या सर्वच कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी त्यांनी मेहकर तालुक्यात केली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुकुल वासनिक यांनी अनेकदा देवानंद पवार यांच्या कामाचे कौतुक केले आहे. दरम्यान काल, ७ नोव्हेंबरला वासनिक मेहकर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी तालुका काँग्रेस कमिटीच्या कामाचा आढावा घेतला होता. दरम्यान आज शेगाव येथे झालेल्या बैठकीत देवानंद पवार यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी, खा.राहुल गांधी, खा.मुकुल वासनिक तसेच प्रांताध्यक्ष नाना पटोले या मान्यवरांना अभिप्रेत असणारे पक्ष संघटन बांधून काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याकरीता आपण प्रयतनशील राहाल अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंनी देवानंद पवार यांना नियुक्तीपत्र देतांना केली आहे. या नियुक्तीमुळे मेहकर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.