राज्याचे "दादा" उद्या जिल्ह्यात! दिवसभर मातृतीर्थ सिंदखेडराजात घेणार विकासाचा आढावा; सायंकाळी गाजवणार जळगाव जामोदचे मैदान! सोबतीला असणार नाथाभाऊ
उद्या सकाळी ९:४० वाजता हेलिकॉप्टरने ते सिंदखेडराजा येथील जिजाऊ सृष्टी येथे पोहचतील. त्यानंतर सकाळी १० वाजता जिजाऊ जन्मस्थळाचे दर्शन, सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक स्थळांची पाहणी, त्यानंतर दुपारी २ वाजता सिंदखेडराजा येथील पंचायत समितीच्या सभागृहात विकासकामांचा आढावा बैठकीस उपस्थिती. ४.४० वाजता देऊळगाव राजा रोडवरील समृध्दी महामार्गाच्या इंटरचेंज येथे राजमाता जिजाऊ व बाल शिवबा यांच्या नियोजित पुतळा उभारणी स्थळाची ते पाहणी करणार आहेत.
त्यानंतर सायंकाळी ५ वाजता ते हेलिकॉप्टरने जळगाव जामोदकडे प्रयाण करतील. संध्याकाळी ७ वाजता जळगाव जामोद येथील एसकेके कॉलेजच्या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित कृतज्ञता सभेला ते संबोधित करणार आहेत. या सभेला माजी मंत्री एकनाथराव खडसे हेदेखील उपस्थित राहणार आहेत. गेल्या महिनाभरापासून जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी, प्रसेनजित पाटील यांनी या सभेची जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी ही सभा ऐतिहासिक ठरणार असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.