आमदार संजय रायमुलकरांच्या फेसबुकवरून शिवसेनेचा धनुष्यबाण गायब! चर्चेला उधाण..!

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणून आलेले शिंदे-सेनेचे मेहकरचे आमदार संजय रायमुलकर यांच्या फेसबुकवरून गेल्या काही दिवसांपासून धनुष्यबाण गायब झालाय. त्यामुळे एका वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात संजय रायमुलकर व संजय गायकवाड हे जिल्ह्यातील दोन्ही आमदार सक्रिय आहेत. शिंदेंना मुख्यमंत्री पद मिळाल्याने दोन्ही आमदारांचे समर्थक सुद्धा जाम खुश आहेत..

केवळ एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्याचे कारण पुढे करून शिवसेनेने माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची हकालपट्टी केल्याचे वृत्त होते. मात्र आज, ३ जुलै रोजी शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेतच असल्याचा खुलासा शिवसेनेने केला. त्यातच आज, ३ जुलै रोजी विधानसभा  अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे समर्थक आमदारांनी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांचा व्हीप न पाळल्याने त्यांच्यावर शिवसेनेकडून कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.

त्यातच गेल्या काही दिवसांपासून आमदार संजय रायमुलकर यांच्या फेसबुक करून आता धनुष्यबाण गायब झाल्याने नव्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बुलडाणा व मेहकरात एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी फलक लागले.

त्यावरून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटोही गायब झालेत..सध्या एकनाथ शिंदे आम्हीच खरी शिवसेना असा दावा करीत असले तरी हा झगडा केंद्रीय निवडूक आयोगाकडे जाण्याची शक्यता आहे..त्यातच आ. रायमुलकर यांच्या फेसबुक वरून धनुष्यबाण गायब झाल्याने वेगळ्या चर्चा सुरू झाल्यात ..मात्र अद्याप खासदार प्रतापराव जाधव यांच्या फेसबुकवर धनुष्यबाण कायम आहे...बघुया पुढे काय काय होते ते...!