संजय राऊत दहा तोंडाचा रावण! कुठल्या तोंडाने काय बोलेल याचा नेम नाही..! भाजपा प्रवक्ते विनोद वाघांचा हल्ला..!

 
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपा प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी खरपूस भाषेत टीका केली आहे. संजय राऊत म्हणजे दहा तोंडाचा रावण आहे, कुठल्या तोंडाने काय बोलेल याचा नेम नाही असा घणाघात विनोद वाघ यांनी केला आहे. विनोद वाघांच्या टिकेला आता संजय राऊत प्रत्युतर देतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संजय राऊत यांना दहा तोंडाचा रावण म्हणत असताना वाघ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम लक्ष्मणाच्या जोडीची उपमा दिली आहे.  सिंदखेडराजा तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत वाघ यांनी हे वक्तव्य केले आहे. नवीन सरकार आल्यापासून अनेक लोकहिताचे निर्णय घेतले जात आहे.

राम- लक्ष्मणाची ही जोडी राज्याला नव्या उंचीवर घेऊन जाईन. पेट्रोल डिझेल वरील कर कमी करून सामान्य जनतेच्या हिताचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी सुद्धा अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत असे विनोद वाघ म्हणाले..!!