प्रा. गजाननसिंह मोरेंचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश!म्हणाले, आता बाळासाहेबांची शिवसेना वाढवण्यासाठी झटणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले स्वागत
Nov 20, 2022, 10:13 IST
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खा. प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेत अनेकांचे पक्षप्रवेश होत आहेत. दरम्यान चिखली,बुलडाणा, खामगाव या तालुक्यांत मोठे प्रस्थ असलेले, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे प्राचार्य गजाननसिंह शंकरबाबा मोरे यांनी नुकताच बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा झाला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गजाननसिंह मोरे यांचे पक्षात स्वागत केले.
गजाननसिंह मोरे हे शिक्षणमहर्षी स्व. शंकरबाबा मोरे यांचे चिरंजीव आहेत. दत्तात्रय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समिती चिखलीचे माजी संचालक सुद्धा आहेत. याशिवाय चिखली तालुक्यातील दिवठाणा गावचे सरपंचपदही त्यांनी भूषवले आहे. शिक्षण,कृषी आणि सहकार व सामाजिक कार्यात ते नेहमी सक्रिय असतात. त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षाला मोठा फायदा होणार आहे. दरम्यान आता,बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी मेहनत घेणार असल्याचे गजाननसिंह मोरे यांनी सांगितले. गजाननसिंह मोरे यांनी पक्षात प्रवेश केल्याने पक्षसंघटन मजबूत होणार असल्याचे खा. प्रतापराव जाधव यांनी म्हटले आहे.