राज्यात राजकीय भूकंप! पण सोशल मीडियावर विनोदांची रेलचेल! एकनाथ खडसे, म्हणतात मी पंगतीला बसल्यावरच बुंदी कशी संपते.. वाचा व्हायरल होणारे जोक्स..!
Updated: Jun 21, 2022, 20:20 IST
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एकनाथ खडसे यांच्या बंडामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे नाराज आमदारांचा गट घेऊन गुजरात मध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. या सगळ्या घडामोडींवर अनेक मीम,जोक्स व्हायरल होत आहेत.
एकनाथ खडसे यांनी कालच विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर बाजी मारली. देवेंद्र फडणवीस यांना शह देण्यासाठी खडसे यांना मंत्रिपद देण्यात येईल अशी चर्चा असतांनाच एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्यावर जोक्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वाचा व्हायरल होणारे जोक्स
१)मी पंगतीला बसल्यावर नेमकी माझ्याजवळ येवून बुंदी कशी काय संपते...? - नाथाभाऊ खडसे*
२)उद्या सकाळसाठी चहा पावडर आणि दूध आणून ठेवा जास्त - राज्यपाल कोश्यारी
३)राज्यपाल भगतसिंग कोश्यारी लवकर झोपले! उद्या सकाळी लवकर उठावे लागणार आहे
४)सर्व जण माझ्याकडे अस शंकेच्या नजरेने का बघताय, मी इथेच आहे: -अजित पवार