POLITICAL BREAKING ! जिल्ह्यातही येणार 'निष्ठा यात्रा' !! पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीचीही शक्यता...? 

 
बुलडाणा ( संजय मोहिते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  शिवसेनेतील महाबंडाळी नंतर झालेल्या उलथापालथमुळे आणखी फूट टाळावी अर्थात डॅमेज कंट्रोल साठी' युवराज ' आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ' निष्ठा यात्रा' काढण्यात येत आहे. नजीकच्या काळात ही यात्रा बुलडाणा जिल्ह्यतही येणार आहे. यावर कळस म्हणजे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य जिल्हा भेटीची चर्चा ही रंगली आहे.

यामुळे जुलैच्या उत्तरार्धात जिल्हा शिवसेना वर्तुळ आणि पर्यायाने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघणार आहे. सेनेतील बंड आणि सत्तांतर नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पायउतार झाले . यामुळे हादरलेल्या शिवसेनेने प्रतिहल्ल्याची  तयारी करीत पक्षांतर्गत बैठकांचा धडाका लावला. तसेच पदाधिकाऱ्यांकडून शपथ पत्रे भरून घेत कोर्ट अन निवडणूक आयोगाकडे होणाऱ्या पुढील कायदेशीर लढ्याची तयारी केली. याशिवाय खासदार, माजी आमदार , जिल्हा प्रमुख आदींच्या वारंवार बैठका घेतल्या. 

याला समांतर राजकीय डावपेच म्हणून  युवासेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निष्ठा यात्रा काढण्यात आली. प्रमुख्याने बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात ही यात्रा जाणार आहे.  बंडाचे एक महत्वाचे केंद्र  आणि सेनेची ताकद असलेल्या  बुलडाणा जिल्ह्यात चालू महिन्यात लवकरच ही यात्रा दाखल होणार आहे.   बृहन्मुंबई मध्ये अंतिम टप्प्यात असणारी व चांगला प्रतिसाद मिळणारी ही यात्रा लवकरच जिल्ह्यात येणार आहे. मुंबईतील बैठकमध्ये सहभाग झालेले जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी बुलडाणा लाइव्ह सोबत बोलतांना याला दुजोरा दिला.

आपण  शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निष्ठावान पाईक असून कोणत्याही परिस्थितीत  शिवसेना सोडणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकारी याच मताचे असल्याचा दावाही जालिंदर बुधवत यांनी बोलून दाखविला. पक्षप्रमुख 'उद्धव साहेब' यांच्या संभाव्य दौऱ्याची शक्यता नाकारता येत नाही असे सूचक विधान त्यांनी या अनौपचारिक चर्चेत केले...!!